भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर: मॅकस्वीनी आणि इंग्लिसला संधी

ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी 13 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू होणाऱ्या या सामन्यात नॅथन मॅकस्वीनी, जोश इंग्लिस आणि स्कॉट बोलँड यांचा समावेश आहे.
मॅकस्वीनी उस्मान ख्वाजासोबत डावाची सुरूवात करू शकतो, तर बोलँडला वेगवान गोलंदाजीचा बॅकअप म्हणून घेतले आहे. इंग्लिसचा समावेश अपेक्षेप्रमाणे आहे, कारण तो अलीकडेच वनडे आणि टी-20 कर्णधार बनला. कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करतील.
पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये, आणि दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाईल. भारताने 2014 पासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकही कसोटी मालिका गमावलेली नाही.

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, स्कॉट बोलँड, नॅथन लायन.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जैसवाल मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.