बघा: अविश्वसनीय; 15 ओव्हर्स, 10 मेडन, 4 विकेट आणि 0.30 ची इकॉनमी रेट. जेडन सिल्सची कमाल, उमेश यादव ला मागे टाकल

वेस्ट इंडिजचा युवा जलदगती गोलंदाज जेडन सील्सने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आपली छाप पाडली. सबीना पार्कवर सुरू असलेल्या या सामन्यात सील्सने आपल्या अचूक आणि प्रभावी गोलंदाजीने बांगलादेशी फलंदाजांना अडचणीत आणलं.
अवघ्या 16 षटकांत 10 मेडन्स टाकत केवळ 5 धावा देत 4 महत्त्वाच्या विकेट्स घेत, सील्सने 1978 नंतरची कसोटी क्रिकेटमधील सर्वांत किफायतशीर कामगिरी नोंदवली. 23 वर्षीय सील्सने 0.30 चा इकोनॉमी रेट राखत ही शानदार कामगिरी केली. या प्रदर्शनाने त्याने भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादवचा विक्रम मागे टाकला. उमेशने 2015 मध्ये 3/9 च्या आकड्यांसह 0.42 चा इकोनॉमी रेट राखला होता.
सील्सचा भेदक मारा आणि साथीदारांचा पाठिंबा
सील्सने आपल्या आगळ्या गोलंदाजीने बांगलादेशी फलंदाजांना बांधून ठेवलं. त्याचबरोबर शामार जोसेफने 3 विकेट्स घेत चांगली साथ दिली. अनुभवी केमार रोचने 2 विकेट घेतली, तर अल्झारी जोसेफने 1 फलंदाज बाद केला.
वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी मिळवली सुरुवातीची आघाडी
फलंदाजीत वेस्ट इंडिजच्या संघाने क्रेग ब्राथवेट आणि मायकेल लुईस या सलामीवीरांसह मैदानात सुरुवात केली. मात्र, लुईस केवळ 25 धावांची भागीदारी करून बाद झाला. नाहिद राणाने पहिला झटका दिला.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार ब्राथवेट (33 धावा, 115 चेंडू) आणि कॅसी कार्टी (19 धावा, 60 चेंडू) यांनी वेस्ट इंडिजच्या 70/1 धावसंख्येवर डाव रोखला.
बांगलादेशचा डाव कोसळला
सामन्याच्या पहिल्या डावात नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या बांगलादेशच्या संघाने चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, पण वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीसमोर त्यांचा डाव गडगडला.
शादमन इस्लाम (64 धावा, 137 चेंडू) आणि कर्णधार मेहदी हसन मिराज (36 धावा, 75 चेंडू) हे दोन फलंदाजच लक्षणीय योगदान देऊ शकले. शाहादत हुसैन दीपूने (22 धावा, 89 चेंडू) थोडा वेळ साथ दिली. मात्र उर्वरित फलंदाजांना वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांपुढे फार काळ टिकता आलं नाही.
अखेर, बांगलादेशचा पहिला डाव फक्त 164 धावांवर आटोपला.
कसोटी विजयाकडे वाटचाल
सील्सच्या भेदक माऱ्यामुळे वेस्ट इंडिज संघाने बांगलादेशवर नियंत्रण मिळवलं आहे. गोलंदाजीत ठोस कामगिरी करून फलंदाजीत सुरुवातीला स्थिरता दाखवली आहे. पुढील दिवसांमध्ये वेस्ट इंडिजचा विजय निश्चित मानला जात आहे.
पिंक-बॉल टेस्टमध्ये भारतासाठी ॲडलेडचं आव्हान, जिथे ऑस्ट्रेलियाचा कधीच पराभव झालेला नाही
mx9rty