हार्दिक पांड्याची ICC T20I अष्टपैलू क्रमवारीत अव्वल स्थानी झेप, तिलक वर्माची तिसऱ्या क्रमांकावर झेप
भारतीय स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या आता ICC T20I क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू बनला आहे. ताज्या क्रमवारीत हार्दिकने दोन स्थानांची झेप घेतली आहे. त्याच्याकडे 244 गुण आहेत, जे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दीपेंद्रसिंग ऐरीपेक्षा 13 गुण जास्त आहेत. हार्दिकने इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टनला पहिल्या स्थानावरून खाली खेचले आहे. लिव्हिंगस्टन आता तिसऱ्या क्रमांकावर गेला असून त्याच्याकडे 230 गुण…