IND vs AUS, दुसरी कसोटी: ऑस्ट्रेलियाच्या संघात ब्यू वेबस्टरचा समावेश, पिंक बॉल कसोटीसाठी जय्यत तयारी
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिकेचा दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ऍडलेड ओव्हलवर खेळवला जाणार आहे. पिंक बॉल डे-नाईट सामन्याच्या तयारीत असलेल्या ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात एक महत्त्वाचा बदल केला आहे. मिचेल मार्शच्या फिटनेस समस्येमुळे तस्मानियाचा अष्टपैलू खेळाडू ब्यू वेबस्टरला संघात स्थान देण्यात आले आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलिया मोठ्या दडपणाखाली आहे, आणि वेबस्टरचा समावेश हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा…