बघा: श्रीलंकेचा संघ अवघ्या 42 धावात ऑल आउट, मार्को जानसेनच्या नावे 7 विकेट्स
डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को जान्सेनने आपल्या करिअरमधील सर्वोत्तम कामगिरी करत 7 बळी घेतले आणि श्रीलंकेचा पहिला डाव केवळ 42 धावांवर संपुष्टात आणला. ही कामगिरी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या डर्बन टेस्टमध्ये झाली, जिथे श्रीलंकेचा डाव फक्त 13.5 षटकांत आटोपला. दिवसाचा खेळ संपताना दक्षिण आफ्रिकेला 149 धावांची मोठी आघाडी मिळाली, कारण यापूर्वीच त्यांचा पहिला डाव 191 धावांवर संपला होता….